जगातील सर्वात मोठे उद्योग समूहाच्या प्रमुखाचे निधन रसायन मिस्त्री | rasayan mistri life info |
भारतात दर मिनिटाला काही लोकं मरत असतात पण त्यांची दखल त्यांच्या कुटुंबापलीकडे कोणी घेत नाही. काल पालघर येथे झालेल्या अपघातात एक असा व्यक्ती गेला. ज्याची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागली. पालघर जिल्हात झालेल्या दुर्दैवी अपघातात टाटा समूहाचे प्रमुख राहिलेले आणि शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष असलेले सायरस मिस्त्री यांनी जगाचा निरोप घेतला.
गेल्या काही दिवसात भारताने उद्योग जगतातील दोन मोठे व्यक्तिमत्व गमावले आहेत. काहीच दिवसापूर्वी शेअर बाजाराचे बादशहा राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले तर आता सायरस मिस्त्री आपल्यातून निघून गेले. अशा व्यक्तींचा मृत्यू झाल्याने केवळ त्या व्यक्तीच्याच कुटुंबाची मोठी हानी होत नसते तर देशाची देखील मोठे नुकसान होत असते. कारण देशाच्या विकासात, प्रगतीत या लोकांनी फार मोठे योगदान दिलेले आहे.
टाटा समूहाने आपल्या देशाच्या विकासाचा पाया घालण्यात फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. हे कोणापासून लपून राहिलेले नाही. टाटा समूहाचा इतिहास हा तब्बल १४४ वर्षांचा आहे. या १४४ वर्षाच्या इतिहासात फक्त सहा व्यक्तींनी टाटा समूहाचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. त्यापैकी सायरस मिस्त्री एक होते. यावरूनच त्यांचे महत्व कळते. जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली. तेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर राज्याचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री अशा अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना तर रडू आवरले नाही. केवळ राजकीय क्षेत्रातून नाही तर जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे.
रस्ते अपघातात सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. या अपघाताशी चौकशी होत राहील पण या व्यक्तीचे जीवन कसे होते, ते गेल्यामुळे देशाची किती मोठी हानी झाली आहे आणि सायरस मिस्त्री यांच्याकडून आपण काय शिकू शकतो. याबद्दल बोलूयात.
सायरस मिस्त्री यांचा जन्म आयर्लंड मध्ये झाला. आयर्लंड हा देश जगातील अत्यंत विकसित देश म्हणून ओळखला जातो. ज्याचा मानव विकास निर्द्शांकात पहिल्या दहा मध्ये क्रमांक असतो. अमेरिकेपेक्षाही या देशातील लोकं अधिक चांगले जीवन जगतात. अशा देशात शापूरजी पालोनजी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आर्यलंड देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी हे एक कुटुंब आहे. ज्या शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री राहिलेले आहेत. भारतातील हा एक मोठा उद्योग समूह आहे. या उद्योग समूहाने भारतातील विकासात मोठे योगदान दिलेले आहे. ज्या कुटुंबाचा हा उद्योगसमूह आहे. तेच कुटुंब आर्यलंड मध्ये राहत असते.
सायरस मिस्त्री यांनी आपले उच्च शिक्षण लंडन मधून पूर्ण केले. त्यांनी लंडनच्या प्रतिष्ठित अशा बिझनेस स्कूल मधून शिक्षण घेतलेले आहे. सायरस मिस्त्री यांनी शापूरजी पालनजी उद्योग समूहात १९९१ सालापासून काम करण्यास सुरुवात केली. पुढच्या तीन वर्षातच म्हणजे १९९४ साली ते शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष झाले. सायरस मिस्त्री यांना आपला बिझनेस कुटुंबाकडून जरी मिळालेला असला तरी ते आपल्या कामगिरीतून समूहाचे अध्यक्ष झाले होते. हे त्यांनी नंतर केलेल्या कामगिरीतूनही स्पष्ट होते.
सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वात शापूरजी पालनजी समूहाने फार मोठी झेप घेतली. त्या समूहाचा व्यवसाय हा दोन कोटी पाउंड वरून चक्क दीड अब्ज पाउंड पर्यंत गेला. कंपनीला त्यांनी प्रचंड नफा कमावून दिला. हे त्यांनी फक्त त्यांच्या कंपनीसाठी केले असते तर त्यांचे एवढे नाव झाले नसते. त्यांचे नाव झाले ते त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या एकापेक्षा एक मोठ्या विक्रमांनी. भारतातील सर्वात उंच रहिवासी इमारत, सर्वात लांब रेल्वे पूल, सर्वात मोठ्या बंदराचे बांधकाम हे त्यांच्या नेतृत्वात झाले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या कामाचा धडाका एवढा मोठा होता की, उद्योग क्षेत्रातील दिग्गजही अचंबित झाले. त्यांनी केलेल्या या कामामुळेच केवळ १२ वर्षात म्हणजे २००६ साली त्यांचा टाटा सन्सच्या संचालक मंडळात समावेश झाला. अवघ्या ३८ व्या वर्षी ते टाटा सन्सच्या मंडळात सामील झाले होते. या एका बातमीनेच उद्योगक्षेत्र हादरले होते. काही वर्षातच त्यांनी एवढी प्रगती केली की टाटा समूहाचे सर्वाधिक शेअर्स त्यांच्या कुटुंबाकडे आले.
रतन टाटा २०१२ मध्ये निवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीने टाटा समूहाच्या अध्यक्षपदी बसण्याची हे केवळ दुसरी वेळ होती. यावरून विचार की, त्यांचा अनुभव, कामगिरी, क्षमता किती प्रचंड होती. टाटा सन्सच्या संचालक मंडळात प्रवेश झाल्यावर केवळ सहा वर्षात ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले होते. टाटा कुटुंबाच्या बाहेर टाटा समूहाचे अध्यक्ष होणं ही फार मोठी गोष्ट आहे. भारतात असं एकही उद्योग क्षेत्र नसेल ज्यात टाटा कंपनी काम करत नसेल. मीठ बनवण्यापासून ते विमानापर्यंत टाटा कंपनीचा अवाढव्य व्याप आहे. त्या सर्व कंपन्याचे बॉस हे सायरस मिस्त्री झाले होते. यावर ते चार वर्ष राहीले. टाटा समूहाच्या पदावर असताना रतन टाटा व त्यांचे काही वाद झाले. ती केस पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. न्यायालयाने सायरस मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडावे लागले. हा एक भाग सोडला तर त्यांची कारकीर्द नेहमी चढती राहिलेली आहे.
सायरस मिस्त्री देशातल्या सर्वात मोठ्या उद्योग समूहापैकी एक असणाऱ्या अध्यक्षपदी होते पण त्यांनी त्या पदाचा कधीही माज दाखवला नाही. ते साधेपणाने आणि अतिशय नम्रपणे वागायचे. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणजे ते ताज हॉटेलचेही अध्यक्ष होते. त्या ताज हॉटेल मध्ये गेल्यास अगदी साध जेवण करायचे. खासदारांच्या घरी गेल्यावर खूप काही करायला न लावता पाणीपुरी आणि साबुदाणा खिचडी खायचे. असे हे व्यक्तिमत्व होते.
अशा या नम्र असलेल्या आणि धडाडीने काम करणाऱ्या सायरस मिस्त्री कडून आपण तीन महत्वाच्या गोष्टी शिकू शकतो.
१ ) काम करत रहा, एक दिवस यश नक्की मिळेल –
बहुतांश लोकं स्वप्न फार मोठी पाहतात पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने व चिकाटीने प्रयत्न करत नाहीत. त्यांची धरसोड वृत्ती असते. टाटा समूहाचे अध्यक्ष होईपर्यंत सायरस मिस्त्री हे कोण आहेत? हे ९९. ९९ टक्के लोकांना माहिती नव्हते. प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करत राहीले आणि जेव्हा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले तेव्हा जग आश्चर्यचकित झाले.
२) प्रसंगी लढायची तयारी ठेवा-
सायरस मिस्त्री यांचा स्वभाव हा नम्र आणि मितभाषी होता. ते कोणाच्या नादाला लागायचे नाहीत किंवा वायफळ विधाने करायचे नाहीत पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ते रतन टाटालाही भिडायला मागे- पुढे पहिले नाहीत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई नेली, शेवट पर्यंत हार मानली नाही.
३ ) तुमच्या जन्मावरून नाही तर कामावरून यश मिळते –
बऱ्याच जणांना वाटेल की, सायरस मिस्त्री हे एका उद्योगपतीच्या कुटुंबात जन्मले होते. त्यामुळे त्यांना सगळं काही सोपं गेलं असेल. यावर थोडा असा विचार करा की, समजा त्यांनी काहीच केलं नसतं तर ते फक्त शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष बनून राहीले असते. त्यांना कोणीही ओळखलं नसतं. त्यांनी केलेल्या अद्भुत कामगिरीमुळेच ते टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. उद्योग घराण्यातून तर अनेक लोकं आलेले आहेत पण कुणालाही टाटा समूहाचे अध्यक्ष होता आलेले नाही. यामुळे माझा जन्म कुठे झाला आहे, हे विसरून जा आणि मोठं ध्येय ठेवून चिकाटीने स्मार्ट काम करत रहा. असं केलं तर कदाचित तुम्ही येत्या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होऊ शकाल.