नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत नवीन अर्ज मागवायला सुरू झाले आहेत. गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना आपणही लाभ घ्या.| Navin purn Yojana antargat Navin arj |

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत नवीन अर्ज मागवायला सुरू झाले आहेत. गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना आपणही लाभ घ्या.| Navin purn Yojana antargat Navin arj |

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत नवीन अर्ज मागवायला सुरू झाले आहेत. गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना आपणही लाभ घ्या.| Navin purn Yojana antargat Navin arj |

शेतकरी मित्रांनो पशुपालन हा शेतीवर आधारित जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून शेतकरी गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या अशा पद्धतीचे प्राणी शेती सोबतच पाळत आलेला आहे. याचं कारण म्हणजे शेतीसोबत जर समजा तुमच्याकडे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या किंवा कोंबड्या यापैकी काही असेल तर तुम्हाला शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाला एक पर्यायी उत्पन्न मिळतं.
आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये शेतकरी बांधवांनी पशुपालन करावा आणि त्यांना पशुपालनातून एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावया करता महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनांच्या अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पात्र शेतकरी व्यक्तींना गाई म्हशी शेळी मेंढी कुक्कुटपालन योजना याकरिता निधी वाटप करण्यात येत असतो. गटवाटप आणि अनुदान देण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजना 2022 23 करिता अर्ज भरून शेतकरी शासनाच्या योजनांचा फायदा घेऊ शकतात. याकरिता अर्ज कसा भरावा, योजने करिता पात्रता काय असेल, या योजनेद्वारे किती अनुदान मिळेल ही सर्व माहिती आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत.

नाविन्यपूर्ण योजना नवीन अर्ज सुरू झाले आहेत. गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकरिता आणि त्यांचे आर्थिक विकासाकरिता त्यांना शेळी मेंढी तसेच गाव व महेश आणि कुक्कुटपालन यांचे गटवाटप करण्यात येईल याकरता नाविन्यपूर्ण योजना ही अशी एक महत्त्वपूर्ण योजना सरकारने आणली आहे नवीन अर्ज मागवले जात आहेत नाविन्यपूर्ण योजना 2022 23 महाराष्ट्र अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जो अर्ज करावा लागतो तो या लेखात तुम्हाला पाहायला मिळेल तसेच या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्र कोणती असतील अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख या संदर्भात विस्तृत माहिती मिळेल.

नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र शासन कशी असेल? योजनेचे स्वरूप.

शेतकरी मित्रांनो नावीन्यपूर्ण योजना महाराष्ट्र अंतर्गत खालील जनावरे तसेच पशूंचं गट वाटप करण्यात येईल..

शेळी मेंढीचा गट वाटप करणे यामध्ये दहा शेळ्या व एक बोकड तसेच दहा मेंढ्या व एक मेंढा मिळतो.
दुधाळ गाई म्हशींचे वाटप केले जाईल.
कुक्कुटपालन करायचं असेल तर एक हजार मांसल कोंबड्यांचं वाटप होईल.
तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप केले जातील..

अशा प्रकारच्या ह्या योजना नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र ह्या अंतर्गत राबविण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असं आवाहन सरकार तर्फे करण्यात येत आहे.

अशाप्रकारे या नावीन्यपूर्ण योजना 2022-23 महाराष्ट्र(Navinya Purna Yojana 2022-23 Maharashtra) अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुदान एवढं मिळेल.

सरकारने शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांना पशु पुरवायचा निर्धार केला आहे. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत तुम्हाला
वेगळ्या पशु पक्षांच्या गटांनुसार अनुदान मिळणार आहे.

खालील प्रमाणे अनुदान मिळणार आहे.

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असेल तर त्याला 75 टक्के अनुदान मिळतं. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा ओपन प्रवर्गातील असेल तर त्याला पन्नास टक्के अनुदान मिळेल..

अशाप्रकारे पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांकरिता असलेल्या ह्या योजनेअंतर्गत शेळी व मेंढी, गाय, म्हैस व कुक्कुटपालन असा व्यवसाय शेतकऱ्यांनी करावा आणि आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी ह्याकरता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा अनुदान मिळेल.

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अर्ज असा करा

आता ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेळी व मेंढी, गाय, म्हैस व कुक्कुटपालन याकरिता अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा aहा अर्ज तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन वरून सुद्धा घरबसल्या सादर करू शकतात. मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.

अर्ज प्रक्रिया – नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता खालील प्रमाणे अर्ज करा.

ह्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम ah.mahabms या वेबसाईटवर जा किंवा यांचा मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.

अर्ज करण्याच्या वेबसाईटवर जाण्याची लिंक

आता इथे वेबसाईटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अर्ज करण्याकरिता नोंदणी करा. योजने संदर्भात करायचा ऑनलाईन अर्ज भरून घ्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

नाविन्यपूर्ण योजनेच्या महत्त्वाच्या तारखा चुकवू नका

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 जानेवारी 2023 आहे.
25 डिसेंबर पर्यंत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईलडेटा बॅकअप घेण्यात येईल.
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल त्यांना कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याकरिता 26 डिसेंबर z2022 ते 9 जानेवारी 2023 पर्यंत वेळ देण्यात येईल.
नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत त्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली तर ती कागदपत्रे चेक करण्यात yrtilnn त्यांची पडताळणी करण्यात येईल.

पात्र ठरतील त्यांना लाभ वितरण करण्याची प्रक्रिया सुरु करण्या करता 22 जानेवारी 2023 च्या नंतर जिल्हा भरती कागदपत्रांची पडताळणी करून सुरू करण्यात येईल.

शेतकरी मित्रांनो, पशुधन हेच शेतीबरोबर शेतकऱ्यांचे दोन वाढवणारे खरे साधन आहे. म्हणूनच पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा
दि.१३.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून ते दि.११.०१.२०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत राहील.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे.

AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.

आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१-२२ मध्ये AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे.

अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी पूर्णपणे अर्जदाराची राहील. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणासाठी मूळ अर्जात बदल करता येणार नाही.

कुठल्या लोकांना लाभ घेता येणार आहे?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत.केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सन २०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.

सन २०२२-२३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

अर्ज करण्यापूर्वी कृपया योजनानिहाय वेटींग लिस्ट पहावी. उपलब्ध अर्जांची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेवून योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता पडताळून अर्जदारांनी अर्ज करावा.

अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल.

योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने SMS येतील. तसेच सूचनाही मिळतील.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

कॉल सेंटर संपर्क – १९६२ (१०AM to ६PM).

टोल फ्री संपर्क -१८००२३३०४१८ (८AM to ८PM).

मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी मित्रांसाठी आपल्याला महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या गाई, म्हशी, शेळी व मेंढी तसेच कुकुट पालन करिता हया नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अर्ज करायचा आहे.

ह्या योजने संदर्भातील ही ह्या लेखातील माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या योजनांविषयी अधिक माहिती करता. ह्या वेबसाईटवर दिलेली इतर माहिती मिळवण्यासाठी लेख वाचा.

Leave a Comment