केदारनाथ मंदिर विषयी सर्व माहिती |Kedarnath Mandir |

केदारनाथ मंदिर विषयी सर्व माहिती |Kedarnath Mandir |

केदारनाथ मंदिर विषयी सर्व माहिती |Kedarnath Mandir |

हिंदू धर्मातील चार धाम तीर्थाबद्दल प्रत्येकालाच कल्पना आहे आपल्या घरचे वडीलधारी मंडळी म्हणजे सर्वच म्हणतात की मरणाच्या अगोदर प्रत्येक व्यक्तीने एकदा का होईना चार धाम यात्रा करायला हवे आणि याच चार धाम यात्रेतील एक तीर्थ म्हणजे केदारनाथ मंदिर
याच केदारनाथ मंदिराबद्दल या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

उत्तराखंड मधील केदारनाथ या गावांमध्ये मंदाकिनी या पवित्र नदीच्या तटावर हे हिंदू धर्माचे पवित्र नागनाथ मंदिर वसलेले आहे म्हणजेच नागनाथ मंदिरे भगवान शंकराचे मंदिर आहे.

केदारनाथ हे हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे भारतात असणाऱ्या एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे तसेच छोटा धाम आणि पंचकेदार या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.

निसर्गाचा अविष्कार असलेल्या हिमालय पर्वतरांगांमध्ये केदारनाथ धाम वसलेले आहे या मंदिराची निर्मिती पांडवांनी केली असे मानले जाते तसेच गुरुवर्य तसेच आद्य शंकराचार्य यांनी या मंदिराला पुनर्जीवन दिले असे मानण्यात येत आहे आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बारा ज्योतिर्लिंग पैकी केदारनाथ हे सर्वात उंच ठिकाणी वसलेले ज्योतिर्लिंग आहे.

केदारनाथ मंदिर हे मुख्यतः अक्षय तृतीया आणि कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये उघडे असते हिवाळ्यामध्ये या मूर्तीचे मुख्य मठ या ठिकाणी नेऊन पूजन केले जाते.

2013 या वर्षांमध्ये उत्तराखंडमध्ये भयावह अतिवृष्टीचे संकट उडवले होते या महापुरामध्ये केदारनाथ हे संपूर्ण गाव वाहून गेले जवळपास असलेली सर्व ठिकाणी घरे सर्व उध्वस्त झाले परंतु दगडी बांधकाम असलेल्या या केदारनाथ मंदिराला जराही धक्का लागला नाही हे नवलच म्हणावे लागेल.

केदार नाथ मंदिराचा इतिहास । History of kedarnath

भारताच्या उत्तरेकडे असलेल्या उत्तराखंड राज्यात केदारनाथ हे गाव आहे उत्तराखंड राज्याला देवभूमी असेही म्हटले जाते कारण पुराणानुसार भगवान शंकरांचा मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये वास होता हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर राज्य आणि जवळपास 50% बर्फाच्छादित वातावरण यामुळे येथील वातावरणा च्या सुंदरतेत अधिक भर पडते अशाच राज्यांमधील केदारनाथ या गावी शंकरांचं एक अति प्राचीन मंदिर आहे आणि हिंदू धर्मातील अति पवित्र मंदिर म्हणजे केदारनाथ मंदिर.

उत्तराखंड राज्यांमधील केदारनाथ हे सर्वात मोठे शिव मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडांनी केलेले आहे हे मंदिर आठ फूट उंचीच्या एका चभूतऱ्यावर बांधण्यात आलेले आहे आणि या मंदिराची निर्मिती 80 व्या शतकात केलेली असावी असा पुरातत्व विभागाचा अंदाज आहे.

केदारनाथ मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करताना पौराणिक कथांचा संबंध लागतो केदारनाथ मंदिराचा इतिहास हा पूर्णपणे महाभारताला जोडलेला आहे कथा नुसार ज्यावेळी कौरव आणि पांडवांचे घामासन युद्ध झाले आणि कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव झाला आणि पांडवांनी विजय प्राप्त केला त्यावेळी पांडव स्वतःला दोषी समजत होते त्याचं कारण होतं की त्यांना वाटायचं आपण आपल्या शंभर चुलत भावांना मारलं त्यांचा संहार केला या गोष्टी त्यांना सतावत होते या पापातून मुक्त होण्यासाठी पांडवांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली.

त्यासाठी त्यांनी काशी हे ठिकाण निवडले काही दिवस काशी येथे तपश्चर्या केल्यानंतर पांडवांना हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करावी असा आदेश मिळाला या पापातून सहजरीत्या मुक्त करणार नसल्यामुळे भगवान शंकरांनी म्हैस या जनावराचे रूप घेतले आणि ते गुप्तकाशी या ठिकाणी पोहोचले ही म्हैस इतर मशीन पेक्षा वेगळी दिसत असल्याने पांडवांतील एक असलेल्या भिमाने म्हशीची शेपटी पकडली आणि त्या म्हशीला वेगवेगळ्या दोन भागात विखुरले त्या म्हशीचा पाठीचा भाग हा केदारनाथ येथे पडला त्यामुळे केदारनाथ मंदिराची निर्मिती झाली असावी तसेच शरीराचे इतर भाग तुंगनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ आणि मध्य महेश्वर या ठिकाणी पडलेले असावेत यामुळे या पाच ठिकाणांना पुरानात पंच केदार असे नाव देण्यात आलेले आहे.

केदारनाथ मंदिर वास्तू कला । Architecture of kedarnath mandir.

हिंदू धर्माचे आराध्य दैवत आणि पवित्र देवता सर्वांच्या जन्म मृत्यूची नोंद ठेवणारे भगवान शिवशंकर होय आपल्या भारतामध्ये सर्व मिळून बारा ज्योतिर्लिंग आहेत हेच आपणा सर्वांना ज्ञातच आहे त्यातीलच एक ज्योतिर्लिंग उत्तराखंड मधील केदारनाथ या ठिकाणी वसलेले आहे साधारणतः 80 व्या शतकामध्ये केदारनाथ मंदिराची निर्मिती झालेली असल्यामुळे या मंदिराची वास्तू कला, कोरीव काम आणि नक्षीकाम अतिशय सुबक आणि प्राचीन आहे.

कात्यहरी शैली मध्ये या मंदिराचे वास्तु काम करण्यात आलेले आहे या मंदिराच्या निर्मितीसाठी राखाडी रंगाच्या दगडांचे म्हणजेच वालुकास्मांचे मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या मंदिराचा संपूर्ण चर्च लाकडाचा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यावर सोन्याचा सुंदर असा कलश ठेवण्यात आलेला आहे मंदिराचे बांधकाम आणि सुंदर रचना हे अतिशय नयनरम्य आहे दरवर्षी लाखो भावी मोठे मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मंदिरामागे पाण्याची अनेक कुंडे असून ज्यामध्ये स्नान केल्यानंतर मन शुद्धी मिळते असा समज आहे केदारनाथ मंदिराचा पहारेकरी म्हणून मंदिराच्या समोर एक मोठा पाषाण उभा करण्यात आलेला आहे आणि याच पाषाणामुळे 2013 सालामध्ये आलेल्या महापुरातही अभी अशा पाषाणामुळे केदारनाथ मंदिर अतिशय डौलात तसेच उभे राहिले.

केदारनाथ मंदिर हे मुख्यतः तीन महत्त्वाच्या भागांमध्ये विभागले गेलेले आहेत ते तीन भाग म्हणजे गर्भगृह, दर्शन मंडप, आणि समोरील सभा मंडळ..

केदारनाथ यात्रा । Kedarnath Yatra

केदारनाथ यात्रा ही भारतातील सर्वात मोठ्या यात्रेंपैकी एक यात्रा आहे आणि त्यातच बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या मुळे ही यात्रा अतिशय महत्त्वाची आणि पवित्र समजले जाते. भारतातील वेगवेगळ्या भागातील भाविक केदारनाथ यात्रेची वाट आतुरतेने पाहत असतात दरवर्षी मंदिर प्रशासनाकडून यात्रेसाठी एक विशिष्ट तारीख कालनिर्णय अनुसार निवडली जाते.

केदारनाथ मंदिर उघडण्याची तारीख आणि वेळ हे हिंदू पंचांगानुसार ठरवले जाते आणि उखीमठ मध्ये असलेल्या ओमकार ओमकारेश्वर पुजारी याद्वारे ही यात्रेची तारीख ठरवण्यात येते. केदारनाथ मंदिराचे उद्घाटन कधी होणार याची तारीख अक्षय तृतीया आणि महाशिवरात्री या दिवशी घोषित केले जाते.

दर्शन वेळ । time to visit

केदारनाथ मंदिर या काळात भारतातील महत्त्वाची तीर्थक्षेत्र बनलेले आहे शंकराचे भक्त आणि हिंदू धर्म भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात केदारनाथ मंदिर भाविकांसाठी दर्शन घेण्यासाठी सकाळी सहा वाजता उघडले जातात तरीही दर्शनासाठी लोक पहाटेपासूनच रांगा सुरू करतात आणि तसेच मंदिर आणि ठरवलेले शुल्क देऊन महा अभिषेक करण्यासाठी मंदिर पहाटे चार वाजता उघडले जाते.

त्यानंतर दुपारी बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत भगवान केदारनाथाची पुजाऱ्यांच्या हस्ते विशेष पूजा मांडण्यात येते आणि पूजा झाल्यानंतर सायंकाळी ठीक पाच वाजता मंदिर पुनश्च एकदा दर्शनासाठी उघडले जाते. साडेसहा वाजेपर्यंत दर्शनास मोबाईल आहे परंतु सायंकाळी साडेसहा वाजता भगवान केदारनाथ यांना शृंगार करण्यासाठी मंदिर अर्धा तास बंद ठेवण्यात येते ते संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत केदारनाथाची आरती केली जाते आणि साडेआठ वाजता मंदिर बंद करण्यात येते.

केदारनाथ बद्दल संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा धन्यवाद

Leave a Comment