जंजिरा किल्ला थोडक्यात माहिती | janjira Killa |

जंजिरा किल्ला थोडक्यात माहिती | janjira Killa |

जंजिरा किल्ला थोडक्यात माहिती | janjira Killa |

 

महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावर असलेला अभेद्य किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यात राजापुरी गावाजवळून तीन ते चार किलोमीटर असलेल्या या जंजिरा किल्ल्याला विस्मरणीय असा इतिहास आहे जवळच एक पद्मदुर्ग किल्ला आहे जो छत्रपती संभाजी महाराजांनी अभेद असा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता.

जझीरा या अरबी शब्दावरून या किल्ल्याचे नाव जंजिरा असे पडले आहे जझीरा या शब्दाचा अर्थ बेट असा होतो त्यातच हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे किल्ल्याच्या चहूबाजूंनी पाणी आहे अंडाकृती आकाराचा हा किल्ला असून राजापुरी गावाकडे तोंड करून या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे

जंजिरा किल्ल्याचा इतिहास। History Of Janjira Fort

बाराशेच्या सुमारास राजापूर गावातील कोळी आणि मच्छीमार लोकांचे किल्ल्याच्या ठिकाणी वस्ती होते म्हणजे हे एक प्रकारचे भेटत होते परंतु त्या लोकांना समुद्री लुटाऱ्यांकडून त्रास होण्यास सुरुवात झाली त्यामुळे त्यांच्यातील एक प्रमुख व्यक्ती रामभाऊ पाटील यांनी समुद्री लुटाऱ्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून निजामाच्या एका अधिकाऱ्याची परवानगी घेतली आणि मेढेकोट किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यांना निजामाची परवानगी घ्यावी लागली कारण त्या काळामध्ये तो परिसर निजामांच्या देखरेखी खाली होता.

काही काळानंतर बेटावरील मच्छीमारांनी पूर्णतः लाकडांच्या उंडक्यापासून हा किल्ला बनवला 1490 पर्यंत हा किल्ला पूर्णपणे स्वतंत्र होता म्हणजे या किल्ल्यावर चौदाशे 90 पर्यंत कोणताही राज्यकर्ता हा किल्ला जिंकू शकला नाही एक 1485 मध्ये मलिक अहमद याने किल्ल्यावर आक्रमण केले परंतु मच्छीमार आणि पराक्रमी रामभाऊ पाटील यांच्यापुढे मलिक अहमद ला हार मानवी लागली आणि किल्ला जिंकण्याचे स्वप्न सोडून तो माघारी फिरला.

पण या काळात रामभाऊ पाटील यांचे मच्छिमार आणि कोळी समाजात वाढणारे वर्चस्व निजमांना खटकत चालले होते यामुळे निजामांनी किल्ला जिंकण्याची जबाबदारी पिरमल खानाकडे दिली. त्याने एक कुटील योजना आखली त्याप्रमाणे तो रामभाऊ पाटील यांच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू लागला. आणि त्याने 1511 मध्ये मैत्रीमध्ये घात केला आणि किल्ला ताब्यात घेतला.

पिरमल खानाच्या मृत्यूनंतर बुऱ्हा खानाच्या ताब्यात जंजिरा किल्ला देण्यात आला. निजामशाही च्या परवानगी घेऊन बुऱ्हा खानने लाकडी किल्ला उध्वस्त करून त्या जागी दगडांचा किल्ल्याचे बांधकाम केले. पंरतु अंबर सिद्धी याने बदशहकडून 1617 मध्ये समुद्री किल्ल्याची जहागिरी मिळवली.

मलिक अंबर सिद्धी हा जंजिरा संस्थानाचा सर्वात मूल जनक मनाला जातो करण याच मलिक अंबर सिद्धी ने आपल्या जीवाची पर्वा न करता जंजिरा किल्ला आपल्या हातून कधीही निसटू दिला नाही. हा किल्ला जिंकण्याचे स्वप्न घेऊन कित्येक जणांनी आक्रमणं केली परंतु कोणालाही हा किल्ला जिंकणे शक्य झाले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या किल्ल्यावर स्वामित्व मिळवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग बनवले, किल्ल्याशेजारी अजून एक किल्ला बांधला ज्याचे नाव पद्मदुर्ग परंतु कित्येक प्रयत्न केल्यानंतर ही सर्व प्रयत्न फसले. आणि हा किल्ला कधीही स्वराज्यात सामील करता आला नाही.

जंजिरा किल्ला तब्बल 330 वर्ष अजिंक्य राहिला. मोठमोठे आक्रमणं ही या किल्ल्याची धुडकावून लावली. शेवटी 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला भारतीय स्वातंत्र्यामध्ये विलीन करण्यात आला.

जंजिरा किल्ला माहिती । Janjira Fort Information

रायगड जिल्ह्यातील राजापुरी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर जंजिरा किल्ला बांधण्यात आला होता अरबी समुद्रातील एका छोट्याशा बेटावर हा किल्ला बांधण्यात आला होता समुद्री लोटारांपासून संरक्षण करण्यासाठी लाकडाच्या ओंडक्यांपासून बेटा भोवती तटबंदी करण्यात आली त्यावेळी रामभाऊ पाटील यांनी या तटबंदीला मेढे कोट असे नाव दिले काही काळानंतर पिरमलखान याने बेटावरील लोकांची कत्तल करून हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला पिरमल खानाच्या मृत्यूनंतर बुरा खान याच्या हातात हातात निजामशाहीने किल्ला सुपूर्द केला जुना लाकडी ओंडक्यापासून बनवलेला किल्ला पाडून बुराखानाने दगडी बांधकाम करून जंजिरा किल्ल्याला नवे रूप दिले जे आताचे नवी बांधकाम आपणास दिसते आहे

ते बांधकाम त्याकाळी गुराखांनी केलेले आहे काही काळानंतर म्हणजेच 1617 मध्ये अंबर सिद्धी या सरदाराने बादशहाकडून समुद्र किल्ल्याची जहागीरदारी मिळवली हा किल्ला 40 फूट उंचीच्या उंच उंच तटबंदीने वेढलेला आहे आणि त्यातच हा किल्ला तब्बल 22 एकर जागेमध्ये बांधण्यात आला होता किल्ल्याला एकूण 19 बुरुज आहेत प्रत्येक बुरुजामधील अंतर 10 11 फूट असावे किल्ल्याच्या तटबंदीच्या कमानीवर आजही आपणास तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात गडाच्या पश्चिमेला तटाच्या बरोबरच खाली दरवाजा आहे त्या दरवाजाला दर्या दरवाजा असेही म्हणतात कारण तो दरवाजा समुद्रामध्ये निघतो किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी सुरू खानाचा वाढ आहे पण त्याची व्यवस्थित डागडुजी न झाल्यामुळे आज तो वाढा पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या किल्ल्यावरून एक भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला होता. तो मार्ग किल्ल्यापासून सुरू होऊन समुद्राखालून जातो तोही तब्बल 50 ते 60 फूट खोल आणि त्याचे दुसरे टोक राजापुरी गावामध्ये निघते.

किल्ल्यावर कसे जावे:

या किल्ल्याला आपणास जर भेट द्यायची असेल तर आपणास पहिल्यांदा पुणे किंवा मुंबई या शहरांमध्ये जावे लागते आपण जर विमान स्वतःची गाडी अथवा रेल्वेने जात असाल तरीही जाऊ शकता मुंबई मधून जंजिरा किल्ला हा 165 किलोमीटर अंतरावर आहे मुंबई किंवा पुण्यामधून जर आपण जंजिरा किल्ल्यावर जात असाल तर आपल्याला अलिबाग किंवा रोहा या मार्गाने जावे लागते अलिबाग या ठिकाणावरून जंजिरा किल्ल्याचे अंतर 54 किलोमीटर आहे किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बोटीचा वापर करावा लागतो किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला बोटी श्रीवर्धन दिघी दिवेआगार मांजरी आणि राजापुरी गाव या ठिकाणावरून आपणास बोटी मिळू शकतात आणि त्यातच राजापुरी गावापासून जंजिरा किल्ल्याचे अंतर जेमतेम चार ते पाच किलोमीटर असल्यामुळे येथून बोटीने जाणे पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरते कारण वेळही कमी लागतो आणि आपण लवकरही पोहोचू शकतो.

जंजिरा किल्ल्याबद्दल काही तथ्य | facts about janjira

◆अंबर सिद्धीने या किल्ल्याचे नाव जंजिरा महारुख असे नामकरण केले होते
◆जंजिरा किल्ल्यावर एकोणवीस बुरुज आणि तब्बल 572 तोफा आहेत
◆हा किल्ला सर्वात अभेद्य असा किल्ला आहे कारण या किल्ल्याला तब्बल 330 वर्ष कोणीही जिंकू शकले नाही
◆या किल्ल्याचा शेवटचा सिद्धी चे नाव मोहम्मद खान असे होते
◆ हा किल्ला स्वतंत्र भारतात विलीन झाला तोपर्यंत जंजिरा संस्थान हे एक स्वतंत्र संस्थान होते
◆हा किल्ला बांधण्यासाठी बुरा खानला बावीस वर्षे लागली होती
◆ या किल्ल्याच्या बेटावर सुपारीची आणि नारळाची खूप झाडे आहेत
◆जंजिरा किल्ला भारतातील महत्त्वाच्या आणि उत्कृष्ट अशा बांधकाम केलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे.

तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर नक्की तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि नवनवीन लेखांसाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या धन्यवाद…!

Leave a Comment