आपल्याला दिवसभर आनंदी राहण्यासाठी फक्त पाच मिनिटे हे वाचा | happy all time |

आपल्याला दिवसभर आनंदी राहण्यासाठी फक्त पाच मिनिटे हे वाचा | happy all time |

आपल्याला दिवसभर आनंदी राहण्यासाठी फक्त पाच मिनिटे हे वाचा | happy all time |

मित्रांनो ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जो रोज लवकर सकाळी ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा हा व्यक्ती सतत टेन्शन आणि ताणतणावाखाली आयुष्य जगत होता ऑफिसमध्ये त्याच्यावर कामाचा प्रचंड लोड असायचा आणि काम वेळेवर पूर्ण नाही झाले की त्याला गोष्टी बोलणे खावे लागायची त्यामुळे त्याची जास्त चिडचिड व्हायची मग तो ऑफिसमधला राग घरी येऊन बायकोवर आणि त्याच्या एकुलत्या एका मुलावर काढायचा त्याला वाटायचं त्याच्या आयुष्याला काही अर्थच नाही मित्र त्याला कॉल करायची तर तो त्यांचे फोन कट करायचा घरात नातेवाईक आले की तो बाहेर निघून जायचा त्याला असं वाटायचं अख्या जगाचे दुःख त्याच्याच वाट्याला आले आहे एके दिवशी संध्याकाळी तो असाच टेन्शनमध्ये घरी बसलेला असतो तेवढ्यात त्याचा मुलगा त्याच्यापाशी येतो त्याला म्हणतो बाबा मला गृहपाठ पूर्ण करायला मदत करा ना तेव्हा तो आपल्या मुलावर खूप चिडतो त्याच्यामुळे ओरडतो मी का इथे गृहपाठ करायला बसलो आहे का आपल्या वडिलांचा असा रुद्रावतार बघून तो मुलगा शांतपणे तिथून निघून जातो काही वेळानंतर त्या व्यक्तीला जाणीव होते की आपण निष्कारण आपल्या मुलावर ओरडलो त्याला नक्की काय मदत हवी होती हे ऐकून तरी घ्यायला हवे होते त्याला त्याची चूक लक्षात येते तो मुलाच्या खोलीमध्ये येतो बघतो तर तेव्हा ना त्याचा मुलगा गृहपाठ करता करताच झोपी गेलेला असतो त्याच्या शेजारी गृहपाठाची वही तशीच उघडी असते ती व्यक्ती ती वही उचलते आणि बंद करायला लागते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो बघू तरी आपल्या मुलाने काय लिहिले आहे वहीमध्ये एक शीर्षक लिहिलेले असते अशा गोष्टी ज्या सुरुवातीला आपल्याला आवडत नाही.

पण नंतर हळूहळू आवडायला लागतात या विषयावर त्या मुलाला निबंध लिहायचा होता आता त्या व्यक्तीची उत्सुकता अजून वाढते आता नक्की आपल्या मुलाने अशा कोणत्या गोष्टी लिहिल्या आहेत हे त्याला पाहायचे असते आणि पुढे तो वाचू लागतो मुलाने लिहिलेले असते मी सर्वात पहिले आभार मानतो माझ्या शाळेत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा जे सुरुवातीला मला अजिबात आवडायचं नाही पण त्या परीक्षा झाल्यानंतर मला उन्हाळ्याच्या भरपूर सुट्ट्या मिळतात मी आभार मानतो त्या बेचव कडू औषधांचा जे सुरुवातीला तर मला अजिबात आवडायचे नाही पण त्यांच्यामुळे माझे आरोग्य चांगले राहते मी आभार मानतो माझ्या शाळेचा जिथे सुरुवातीला मला जायला अजिबात आवडत नव्हते पण त्या शाळेमुळेच आमच्या ज्ञानात भर पडत आहे आम्ही घडत आहोत मी आभार मानतो त्या देवाचे ज्याने मला माझे वडील दिले सुरुवातीला माझे वडील माझ्यावर रागावतात पण नंतर ते मला बाहेर फिरायला घेऊन जातात चांगली चांगली खेळणी आणून देतात मला चांगला चांगला खाऊ घेतात त्यामुळे देवा मी तुझा खूप आभारी आहे मला तू असे वडील दिले कारण माझ्या मित्राचे तर वडीलच नाहीये जेव्हा ती व्यक्ती शेवटची ओळ वाचते त्याच्या पायाखालची जमीन सरकते ती शेवटची लाईन त्याला खडबडून जागे करते त्याला याची जाणीव होते की त्याच्या आयुष्यात किती चांगले चांगले गोष्टी आहे ज्याच्याकडे त्याचे लक्षच नाहीये आपल्या मुलाचा निबंध पुढे कंटिन्यू करत तो म्हणतो हे देवा मी तुझी आभार मानतो तुझ्या कृपेमुळे माझ्याकडे घर आहे कित्येक लोकांकडे घरच नाहीये मला हप्ते भरावे लागत असतील पण माझ्याकडे माझं स्वतःचं घर तर आहे तेव्हा मी तुझे खूप आभार मानतो की तुझ्यामुळे माझे एक छानसे कुटुंब आहे कित्येकांचे कुटुंब नसते ते एकटे असतात तेव्हा मी तुझी आभार मानतो की माझ्याकडे नोकरी आहे ऑफिस आहे.

मला पगार मिळतो भले थोडा कामाचा लोड आहे भले माझा बॉस थोडा कडक आहे पण माझ्याकडे नोकरी तर आहे कित्येक लोकांना नोकरीच नसते मी देवाचे आभार मानतो की देवाने मला एक सुंदर मुलगा दिला आहे ह्या जगात अनेक जोडपी अशी आहेत जे मुलं होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे पण त्यांना मुलं होत नाहीये तेव्हा मी तुझे खूप खूप आभार हे सुंदर आयुष्य दिल्याबद्दल मित्रांनो गोष्ट छोटी आहे पण यातले मर्म तुम्ही आत्मसात केले तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आयुष्याची मिळाली आहे त्यात आनंदी राहायला शिका आणि त्याच आनंदाने पूर्ण प्रयत्न करून जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करा ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात मला कमेंट मध्ये सांगा.

2 तुमच्या आयुष्यातल्या ह्या सहा गोष्टी कोणाला सांगू नका | 6 things to keep private in life |

मित्रांनो माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्याला समाजामध्ये मिळून मिसळून राहावे लागते पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळ्याच गोष्टी सर्वांना सांगितल्या पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येकाने गुप्त ठेवल्या पाहिजे प्रायव्हेट ठेवल्या पाहिजे या सहापैकी कोणतीही गोष्ट जर आपण लोकांबरोबर शेअर करत असू तर आपण अडचणीमध्ये येऊ शकतो पहिली आहे तुमच्या

पारिवारिक समस्या

मित्रांनो आपण आपल्या पारिवारिक समस्या नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजे कारण आपल्या समस्या लोकांना सांगून आपण त्यांच्या चर्चेचा विषय होतो ह्या जगात प्रत्येकाला काही ना काही पारिवारिक समस्या असतात पण आपण या समस्या फक्त आपल्या परिवारापर्यंत सिमेंट ठेवल्या पाहिजे कारण लोकांना सांगून त्या समस्यांचे समाधान मिळणार नाही जास्त करून लोकं आपल्या समस्यांचा चेष्टेचा विषय बनवतात आणि अशांनी आपला समाजामध्ये रिस्पेक्ट कमी होतो.

2 तुमच्या नातेसंबंधांमध्ये असलेल्या समस्या

ज्या प्रकारे आपण पारिवारिक समस्या गुप्त ठेवल्या पाहिजे त्याच प्रकारे आपल्या नातेसंबंधांमध्ये असलेले प्रॉब्लेम सुद्धा गुप्त ठेवले पाहिजे कारण तेच आपण लोकांच्या चर्चेचा विषय होतो चेष्टाचा विषय होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लोकांकडून काही समाधान मिळत नाही हा तुमच्या एकदम जवळची विश्वासाची कोणी व्यक्ती असेल जी तुमचा फायदा घेणार नाही अशा व्यक्तीला तुमच्या समस्या जरूर शेअर करा पण शक्यतो तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स प्रायव्हेट ठेवलेलेच बरे.

3 तुमचे उत्पन्न आणि पैशांची आर्थिक परिस्थिती

मित्रांनो जेव्हा आपण आपले उत्पन्न पैशांची आर्थिक परिस्थिती लोकांना सांगतो तेव्हा दोन गोष्टी घडतात तुमची उत्पन्न जास्त असेल तर लोक तुमच्यावर जळतील तुमचा मत्सर करतील आणि तुमची उत्पन्न कमी असेल तर त्यांना तुमची दया येईल त्यांना तुमचा कळवळ येईल सांगायचा मुद्दा या दोन्ही गोष्टी तुमच्या हिताच्या नाही त्यामुळे आपले उत्पन्न आणि आर्थिक परिस्थिती गुप्त ठेवलेलीच बरी

4 तुमचे दोष तुमच्या कमजोरी

जेव्हा आपण आपल्या मध्ये असलेले दोष कमजोरी किंवा आपल्यामध्ये असलेल्या कमतरता लोकांना सांगतो तेव्हा आपण आपला कंट्रोल दुसऱ्यांच्या हातामध्ये देत असतो समोरचा चांगला असला तर ठीक नाहीतर ह्या गोष्टींचा वापर करून समोरचा आपल्याला अडचणीमध्ये आणू शकतो आपण सहानुभूती मिळवण्यासाठी लोकं आपल्या कमजोरी सांगतो पण लोक याच गोष्टींचा हत्यार बनवून आपल्या विरोधात वापरायची शक्यता आहे त्यामुळे आपल्या मध्ये असलेले दोष कमजोरी कमतरता उपीट ठेवलेलेच बरे

5 तुमचे ध्येय आणि स्वप्न

जेव्हा आपण आपले ध्येय स्वप्ने सगळ्यांना सांगत सुटतो तेव्हा आपले मोटिवेशन इच्छाशक्ती आत्मविश्वास कमी होतो तुम्ही म्हणाल तसं काय तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची मते विचार करण्याची पद्धत धारणा वेगळ्या असतात जेव्हा आपण त्यांना आपले ध्येय स्वप्न सांगतो तेव्हा ती लोकं त्यांच्या मानसिकतेनुसार मत मांडतात मग ही मत आपल्या विरोधात असू शकतात आपले खच्चीकरण करणारे असू शकतात नकारात्मक असू शकतात अशांनी आपल्या स्वप्नांविरोधात ध्यान विरोधात आपल्याच मनात निगेटिव्हिटी येऊ शकते त्यामुळे आपली ध्येय स्वप्न ठेवलेलीच बरी

6 दुसऱ्यांनी तुम्हाला सांगितलेली रहस्य

मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती विश्वासाने तुम्हाला त्याचे एखादे रहस्य सांगते आणि ते रहस्य जर तुम्ही अजून कोणाला सांगितले तर पहिल्या व्यक्तीबरोबर विश्वासघात केल्यासारखे आहे अशांनी तुमच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो किंवा मग लोकांचा तुमच्यावरून विश्वास उडू शकतो तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून बघा तुमचे रहस्य सगळ्यांना समजले तर तुम्हाला कसे वाटेल त्यामुळे दुसऱ्याने तुम्हाला सांगितलेली रहस्य उपीट ठेवलेली कधीही चांगली

मित्रांनो या होत्या त्या सहा गोष्टी ज्या शक्यतो तुम्ही गुपित ठेवल्या पाहिजे

Leave a Comment