दिवाळी सणाविषयी थोडक्यात माहिती | Diwali mahiti |
दिवाळी | Diwali
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. आणि आपल्या देशामध्ये सर्वच जाती-धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले.
जातात त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अमेरिका इंग्लंड या देशातही आतिषबाजी आणि रोषणाई केली जाते. संपूर्ण जगातच जल्लोषाचे वातावरण असते.
दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी सणाला सगळ्यांच्या घरी अतिशय आनंददायी वातावरण असते. नवीन कपडे घेतले जातात. नवनव्या गोष्टी खरेदी केले जातात. तसेच लहान मुलांना फटाके फोडण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे रोषणाई केली जाते. अशा या मंगलमय वातावरणात आनंददायी वातावरणात किती उल्हास असतो याचा अनुभव आपण प्रत्येकाने प्रत्येक वर्षी घेतला आहे. परंतु लहान मुलं या दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात याचे एकमेव कारण म्हणजे दिवाळीला मिळणाऱ्या सुट्ट्या मामाच्या गावाला जायला मिळतं. फटाके फोडायला मिळतात . नवीन कपडे घ्यायला मिळतात आणि हेच काय ते सुख यासाठी एक लहान मूल जगत असतं.
हिंदू धर्मीय एका सणाची आवर्जून वाट पाहत असतो. तो सण म्हणजे दिवाळी. दिवाळी साजरी करण्याचे वेगवेगळे कारण आपण ऐकत आले आहोत. त्यातीलच काही महत्त्वाच्या कारणांबद्दल आपण आज या लेखांमधून जाणून घेणार आहोत. कारण आपल्या संस्कृती बद्दल आपल्याला माहिती असणे आणि आपल्या संस्कृतीची आपल्याला जाणीव असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कृती ही मानवाचे मूळ आह. संस्कृती टिकली तरच मानवी जीवन सुरळीत चालेल. अथवा मानवांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण या लेखांमधून दिवाळी सण कसा साजरा केला जातो? आणि का साजरा केला जातो? त्याची कारणे काय? या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
अश्विन महिन्यातील अमावस्या ला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणले जाते.
हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून आपण साजरा करतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून आपण साजरी करतो साडे तीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी आपण सोनेरी खरेदी केले जाते. व्यापार साठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूने या दिवसाचे महत्त्व वाढलेले आहे. या दिवसाला वृत्त प्रतिपदा असेही म्हटले जाते.
राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्रवाणी बळीराजाची ओळख होती महाराजा पुढे पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला तीन पावले भूमी मागितली वचनाला जागून बळीराजांनी हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत पहिले पाऊल स्वर्गात दुसरे पाऊल पृथ्वीवर आणि तिसरे पाऊल पाऊल ठेवण्यास त्याला जागा शिल्लक राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजांनी मस्त पुढे केले तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकांच्या राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पातळ लोकांच्या राज्य बहाल केले आणि वर दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमा श्रुतीची पूजा करतील. व आजचा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जाईल. या दिवशी रांगोळीने बळीची प्रतिमा काढतात. तिथे त्याचे पूजन करतात आणि असेही म्हणतात. आता हा व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्ष कसे करतात पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळदीकुंकू, कंद, फुले, अक्षदा वाहून पूजा करतात. रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीस औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित ज्यांच्या नवीन लग्न झालेल्या असतात ते पहिल्या दिवाळीला मुलगी आणि जावई ते माहेरी जातात.
आपली हिंदू धर्माची संस्कृती फार जुनी आहे. हजारो वर्षाची पूर्वी संस्कृती आपली आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपण सन जे साजरे करतो ना वर्षांमध्ये आपला हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये ग्रंथामध्ये लिहून ठेवले परंतु आजच्या कलियुगामध्ये एक खंत आहे ती म्हणजे वाचायला कुणाला वेळ नाही. त्यासाठी आपण लेखाच्या माध्यमातून बघूया दिवाळीचा कारण काय या पृथ्वीतला वरती मित्रांनो की या पृथ्वीतलावरती रक्तबीज नावाचा राक्षस होता. त्याने ब्राम्हदेवाची आराधना केली आणि ब्रम्हदेव प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की तुझं रक्त जज्यावेळी जमिनीवरती पडेल त्यावेळेला त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून राक्षस तयार होईल. हे सर्व ऐकल्यानंतर रक्तबीज राक्षस खूप जास्त गर्भात बुडाला आणि गावात बुडाल्यानंतर त्याने अक्षरशः देवांवर चाल केले. त्याला दिलेल्या वरदानानामुळे कोणीही त्याला मारू शकत नव्हतं. सगळे देवही त्याला घाबरून पळू लागले त्यावेळी तो आपलं सैन्य घेऊन कैलास पर्वतावर आला.
यावेळी पार्वती माता त्या ठिकाणी होत्या तो पार्वती मातांना पाहून मोहित झाला. मातेला पाहिल्यानंतर मातेला मारण्यासाठी तो मातेच्या अंगावर धावून गेला. हे सर्व पाहून पार्वती मातांना राग आला. यावेळी पार्वती मातेने सांगितले तू पाठीमागे जा नाहीतर जळून जाशील. तरीही त्याने ऐकलं नाही त्याला खूप गर्व झाला होता. कारण त्याला ब्रह्मदेवाचे वरदान होतं. अशावेळी पार्वती मातेने रक्तबीज राक्षसाला अक्षरशः भगवान शिव शंकराचा त्रिशूल फेकून मारला. जसा त्याला तो त्रिशूल लागला त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा बाहेर पडू लागल्या आणि ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार त्याच्या अंगातून पडलेल्या रक्तांच्या थेंबापासून नवीन राक्षस तयार झाले आणि हजारो राक्षस पार्वती मातेच्या समोर रक्तातून प्रकट झाले. हे पाहिल्यानंतर पार्वती माता ला खूप जास्त राग आला. त्या लालबुंद झाल्या. अशावेळी पार्वती मातेने महाकालीच रूप धारण केलं असेही म्हटले जाते की ते रूप पाहून अक्षरशः मृत्यूलोक आणि देवलोक सुद्धा धडकी भरून आले होते. हे रूप पाहिल्यानंतर रक्तबीज राक्षस मात्र घाबरून पळू लागला. पार्वतीने माझे ना तसा पाठलाग केला आणि त्याला मारण्यास चालू केले. देवीने आपला त्रिशूल रक्तबीज राक्षसाला मारला आणि रक्तबीज राक्षसाचे मुंडके उडवले आणि रक्त खाली पडू नये म्हणून त्यासाठी खापराचे भांडे घेतले. त्या खापराच्या भांड्यामध्ये सगळे रक्त पडले. त्यामुळे रक्तबीजापासून नवीन राक्षस उत्पन्न झाले नाही. किंवा त्याचे रक्त सांडले नसल्यामुळे नवीन राक्षसांची उत्पत्ती यावेळी झाली नाही. हा महा भयंकर राग पाहून बाकीच्या राक्षसांनी हार मानले. जर अशातच देवीने जर पृथ्वीतलावर पाऊल ठेवले असते.
तर सर्व देवलोक तर काय पृथ्वी लोकही जिवंत राहिले नसते. सर्व देव भयभीत झाले. या भयानक्राचा वध कोण करणार असा प्रश्न सुटला असला तरी आता देवीचा हा महाभयंकर राग प्रलय रूप कोण शांत करणार? हा नवीन प्रश्न सर्व देव देवी देवतांसमोर पडला. अशावेळी सर्व देवी देवता महादेवांकडे गेले आणि घडलेला प्रकार देवांना सांगितला महादेवांनाही प्रश्न पडला की हा देवाला देवीला शांत कसं करायचं? देवी तांडव करत येत असतानाच महादेव देवीच्या समोर झोपले. आणि देवीचा पायाचा स्पर्श महादेवांना झाला देवीला यावेळी जाणीव झाली ज्यांना आपल्या पायाचा प्रश्न स्पर्श झालाय तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या स्वतःचा पती आहे. हे कळलं आणि महाकालीचे रूप शांत झालं. या सर्व घटनेला स्मरण करण्यासाठी आपण नरक चतुर्थी साजरी करतो आणि या दिवसापासूनच आपल्या दीपावली उत्सवाला सुरुवात होते.
अजून एक दिवाळी साजरी करण्याचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे दिवाळीच्या दिवशीच म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते ज्या दिवशी श्रीराम आयोजित परतले. त्या दिवशी संपूर्ण अयोध्येत जल्लोष झाला होता सर्व सगळीकडे रोषनाई करण्यात आली होती आणि पुराणानुसार हाही एक महत्त्वाचा काळ होता. असेही म्हटले जाते याच दिवसापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा जन माणसांमध्ये रुजवण्यात आली.
अशाप्रकारे या कारणांनी सगळीकडे अतिशय आनंदात दिवाळी हा सण साजरा केला जातो. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा नवीन नवीन लेखांसाठी आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद!!