आज कालच्या महागाईच्या जमान्यात या मार्गाने पैसे खर्च कमी करा | apala kharch Kami Kara |

आज कालच्या महागाईच्या जमान्यात या मार्गाने पैसे खर्च कमी करा | apala kharch Kami Kara |

आज कालच्या महागाईच्या जमान्यात या मार्गाने पैसे खर्च कमी करा | apala kharch Kami Kara |

भारतात गेल्या आठ वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. ग्राहक किमंत निर्दशांक हा ७. ७९ च्या वर गेला आहे. सोप्या भाषेत म्हणजे हा निर्दशांक ६ च्या वर गेला की समजायचं आपल्याला महागाईची झळ बसणार आहे. यात महत्वाचे म्हणजे सुखसोयी वस्तूंची महागाई वाढलेली नाही तर जीवनाश्यक वस्तूंची महागाई वाढलेली आहे. भाजीपाला, इंधन, कपडे या नेहमी लागणाऱ्या वस्तुत महागाईचा दर प्रचंड आहे. सामान्य माणूस म्हणून या महागाईला तर आपण दररोज सामोरे जात असतो. यामुळे महागाईचे आकडे सांगून तुम्हाला घाबरवणे, हा काही आपला उद्देश नाही.

आज आपण या लेखात आकाशाला भिडलेल्या महागाईला कसे सामोरे जायचे. याबद्दल बोलणार आहोत. एका बाजूला महागाईचा भडका उडालेला आहे तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या संकटानंतर सामान्य लोकांची कमाई कमी झालेली आहे. असा दुहेरी बोजा जनतेवर आहे. या संकटाचे वर्णन ‘इकडे आड तिकडे विहीर’ असे करावे लागेल. या संकटात सामान्य लोकं कितीही ओरडले तरी सरकार महागाईवर लगेच काही करणार नाही. सामान्य लोकांवरील करही कमी करणार नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देऊन महागाईचे ओझेही कमी करणार नाही. कारण सध्या कसल्याही निवडणुका आलेल्या नाहीत. निवडणुका जवळ आल्यावरच सरकार सक्रीय होते असते.

या सर्व कारणामुळे या महागाईच्या काळात आपण सामान्य लोकं म्हणून आपले खर्च कसे कमी करू शकतो. ज्यामुळे या प्रचंड महागाईची आपल्याला झळ बसणार नाही. हे आपण पाहूयात.

आपण अशा पाच गोष्टी पाहणार आहोत. ज्यामुळे आपण आपले खर्च कमी करू शकतो आणि महागाईला टक्कर देऊ शकतो.

१ ) गरजेचे नसलेले खर्च करू नका –

शेअर बाजारातील बादशाह वॉरेन बफे यांचे एक फार प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात की, “आपण आवश्यक नसलेल्या गोष्टी विकत घेतल्यास आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील” हे वाक्य महागाईच्या काळात बहुतांश लोकांसाठी तंतोतंत लागू पडते. सध्याच्या काळात चंगळवादी जीवनशैलीचे प्रमाण खूप वाढले आहे. गरज नसताना लोकं अनेक वस्तू विकत घेत असतात. येण्या- जाण्यासाठी साधी गाडी चालते पण इतरांना दाखवण्यासाठी महागडी गाडी घेतली जाते. अशा अनेक वस्तू व गोष्टीबाबत केले जाते. अशा गरज नसताना जेव्हा आपण वस्तू खरेदी करत जातो. तेव्हा आपल्याकडे बचत राहत नाही फक्त खर्च होत राहतो. अशावेळी दवाखान्यासारखा मोठा आणि अति आवश्यक खर्च आला तर कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही.

सध्याचे ज्या बँका, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या आकर्षक मार्ग वापरून आपल्याला खर्च करायला भाग पाडतात. कोणी डिस्काउंट देतं, कोणी एकावर एक फ्री देतं. अशा आकर्षक ऑफर मध्ये न अडकता बचत करावी.

महागाईत आपण असे अनावशाय्क खर्च टाळले तर आपल्याला महागाईची झळ बसणार नाही. लक्ष्यात घ्या… आपण अनेक खर्च समाजाला दाखवण्यासाठी करत असतो. मग ती हायफाय गाडी असो की मोबाईल असो. अशा चंगळवादी वस्तूच्या मायेत आपण हरवून गेलो नाही तर आपण आपला बराच खर्च वाचवू शकतो. असा वायफळ खर्च टाळला तर महागाईची झळ आपल्याला बसणार नाहीच उलट आपण काही प्रमाणात बचत देखील करू शकू.

२) अन्न पदार्थात बदल करा / पर्यायी वस्तू शोधा –

सध्याची जो महागाईचा दर आहे. तो भाजीपाला मध्ये अधिक आहे. भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. जोपर्यंत भाजीपाल्याचे दर चढे राहतील. तोपर्यंत भाजीपाल्याला काही पर्याय शोधता येईल का? ते विचार करा. सध्या डाळीचे दर कमी झाले आहेत. डाळीचा महागाईचा दर २. ५७ टक्क्यावरून १.८६ टक्क्या पर्यंत कमी झाला आहे. तेव्हा आपण काही काळ भाजीपाला या गोष्टीला पर्याय म्हणून डाळीचा वापर वाढवू शकतो. काही महिन्यापूर्वी डाळीच्या दरात अति प्रचंड वाढ झाली होती. तेव्हा डाळ मध्यवर्गीयांच्या देखील आवाक्या बाहेर गेली होती. आता डाळ खाली आहे. त्या गोष्टीचा आपण फायदा घेऊ शकतो व काही काळ डाळीकडे वळू शकतो. यामुळे दोन गोष्टी होतील. एकतर आपला भाजीपालावर होणारा अतिखर्च कमी होईल आणि डाळीचा वापर आपल्या रोजच्या जेवणात झाल्याने शरीराला प्रथिने पण मिळतील.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इधनाच्या महागाईतही मोठी वाढ झाली आहे. इंधनाच्या महागाईचा दर दहा टक्क्याच्या वर गेला आहे. आपला गाडीचा वापर जास्त होत असेल तर तो कमी करायला हवा. आपले ऑफिस जर जवळ असेल तर चालत जाता येईल का? या पर्यायाचा विचार करायला हवा. तसेच आपल्या जवळ बाजाराचे ठिकाण असेल तर गाडी घेऊन जाण्याची गरज नाही. असं आपण आपले नियोजन केले तर आपला पेट्रोलचा बराच खर्च वाचू शकतो आणि चालणे होत नसल्याने व्यायाम देखील होऊन जातो.

३) नियोजन करा –

सामान्य लोकांची मोठी कमतरता म्हणजे आपण चांगल्या प्रकारे नियोजन करत नाही. नियोजन केल्यास आपल्यासमोर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. आपल्याला कळतं की आपला खर्च नेमका कुठे जास्त होतो आहे. असे अनेक खर्च आपण करत असतो, जे केले नसते तर खूप काही फरक पडला नसता. असे अनेक वायफळ खर्च आपण करून टाकतो. हे आपल्या त्यावेळी लक्ष्यात येत नाही. असे खर्च कमी करायचे असतील तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपले खर्च कुठे- कुठे होतात हे शोधणे. आपले खर्च कुठे होतात हे समजल्यावरच आपण त्यावरचे खर्च कमी करू शकतो. या कारणामुळे नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे.

४ ) दररोज स्वयंपाक करायला घ्या –

अनेकांना वाटेल की ही कसली सूचना आहे. पण जरा खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला समजेल की महागाईच्या काळात हॉटेल मध्ये न जाता घरी स्वयंपाक करणे किती महत्वाची गोष्ट आहे. हॉटेल मध्ये जाणे, हे आपल्या जिभेला हव- हवस असतं. या भाववाढीच्या काळात जिभेला थोडेसे बाजूला ठेवून डोक्याने निर्णय घेण्याची गरज असते. स्वयपाक घरी करणे ही कृती हा खर्च कमी करण्याचा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. आपण घरी स्वयपाक करत असतो, त्यावेळी केवळ हॉटेलचा खर्च वाचवत नसतो तर इतर अनेक खर्च वाचवत असतो. हॉटेल मध्ये केवळ जेवणाचा खर्च घेत नसतात तर ते जे सेवा देत असतात त्याचाही खर्च घेत असतात. यामुळे आपण घरात स्वयपाक करून अनेक प्रकारचे खर्च वाचवू शकतो.

 

५) उत्पन्नाचे इतर पर्याय शोधा –

महागाईला सामोरे जाण्याचा सर्वात परिणामकारक उपाय म्हणजे उत्पन्नाचे इतर पर्याय शोधणे. महागाई नियंत्रणात असताना आपला उत्पन्नाचा एकच मार्ग असला तरी महिन्याचा खर्च भागून जातो आणि काही बचतही होऊन जातो. महागाईच्या काळात हा एक असलेला उत्पन्नाचा मार्ग कमी पडायला लागतो. तेव्हा आपल्या क्षमतेनुसार काही वेळ काम करून उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधणे महागाईच्या काळात कधीही चांगला पर्याय आहे. यामुळे आपल्या क्षमतेचा तर आपल्याला उपयोग करण्याची संधी मिळतेच आणि कुटुंबालाही महागाईच्या संकटातून सुखरूप बाहेर काढता येते. उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधल्याने दुसरा एक चांगला फायदा होतो तो म्हणजे काही आवश्यक आणि मोठा खर्च आल्यास असलेली बचत वापरण्याची गरज पडत नाही. उलट आपली थोडी बचतही होऊन जाते.

हे पाच मार्ग वापरल्यास या महागाईच्या संकटात आपण सहज तरुन जाऊ. या पाच गोष्टी करत असताना हे लक्ष्यात ठेवण्याची गरज आहे की, या पाचही मार्गावर चालणे महत्वाचे आहे. आपण उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधला आणि खर्च कमी करता वाढवत राहिलो तर काही फायदा होणार नाही. एका बाजूला तुम्ही उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधताय आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल मध्ये दररोज खाणे, चंगळवादी पद्धतीने जगणे हे सुरु राहीले तर महागाईच्या खड्ड्यात तर तुम्ही पडालच उलट डोक्यावर कर्जाचा डोंगरही वाढेल. यामुळे पाचही गोष्टी करणे गरजेचे आहे.

Leave a Comment